IMPIMP

Creative Foundation Pune | सतीश गायकवाड मित्र परिवार व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने मालोजीराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा; भाजपा कार्यकर्त्यांची सामाजिक कार्यक्रमांची परंपरा – धीरज घाटे

कर्णबधिर मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिन्यातला एक दिवस देणार - दिलीपभाऊ कांबळे

by sachinsitapure

पुणे: Creative Foundation Pune | भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यकर्त्यांचा मूळ पिंड समाजकार्याचा असून एकूण परंपरा सामाजिक उपक्रमांची असल्याचे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) म्हणाले. ह्या कर्णबधिर मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विशेषतः शासकीय पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी मी महिन्यातील एक दिवस देईन असे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Dilip Kamble) यांनी सांगितले. मी समाजकल्याण विभागाचाच मंत्री होतो त्यामुळे मला तुमच्या प्रश्नांबद्दल विशेष आस्था असून मी हे वचन देतो की मी ह्या मुलांचे भविष्य सुसह्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेन असेही ते म्हणाले.

मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सतीश गायकवाड मित्र परिवार च्या वतीने बधिर मूक शिक्षण केंद्र पुणे सुहृद मंडळ, स्मृति बंगला, शि.नगर पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक सतीश गायकवाड, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), विश्वस्त मंजुश्री खर्डेकर (Manjushri Khardekar), नगरसेवक राजेश येनपुरे, आदित्य माळवे, योगेश समेळ, नगरसेविका पल्लवी जावळे, प्रसिद्ध उद्योजक राजनभाई परदेशी, आर पी आय चे निलेश आल्हाट, गुरुद्वारा गुरुनानक दरबार चे अध्यक्ष चरणजित सहानी,शहर चिटणीस शैलेश बडदे, राजाभाऊ भोरडे,इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कर्णबधिर मुलांच्या शाळेसाठी अकरा हजाराचा धनादेश व खाऊ वाटप करण्यात आले. सर्वच दिव्यांगांच्या समस्या शासनाकडे सुटतील असे नाही, शासनालाही नवीन शिक्षक भरती किंवा अनुदान देण्यात अडचणी येतात मात्र आपण सी एस आर फंडाच्या माध्यमातून आपण अश्या संस्थांना मदत करू असे वचन क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिले. तसेच त्यांनी मालोजीराजे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त पटवर्धन मॅडम यांनी धनादेश स्वीकारला व सुमारे 450 कर्णबधिर मुलांचा सांभाळ करताना समाजाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सतीश गायकवाड यांनी संयोजन व आभार प्रदर्शन केले तर गोविंद साठे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Posts