IMPIMP

Criminal Escaped From Police Lockup | चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पुणे पोलिसांच्या लॉकअप मधून फरार

by sachinsitapure

पुणे : Criminal Escaped From Police Lockup | चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीने पोलिसांची नजर चुकवत पळ काढला आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गोविंद उर्फ पिंट्या घोडके असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) त्याला रात्री अटक केली होती.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तुकाई टेकडी हडपसर परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी गोविंद उर्फ पिंट्या घोडके याला अटक केली होती.

हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिंगरप्रिंट घेण्यासाठी त्याला बाहेर काढले होते. यावेळी त्याने सोबत असणाऱ्या पोलिसांची नजर चुकवून पळ काढला.

दरम्यान आरोपी पळून गेल्याने पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात नाकाबंदी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोपीशी संबंधित असणाऱ्या लोकांकडे जाऊन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Posts