IMPIMP

Dengue Outbreak In Pune | पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू बाधितांच्या आकड्यात वाढ; महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु

by sachinsitapure

पुणे: Dengue Outbreak In Pune | पावसाळा सुरु झाल्यापासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मंगळवार पेठेतील सदाआनंदनगरमध्ये २० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

शहरात या महिन्यात डेंग्यूचे ६३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील २१ रुग्ण या आठवड्यात आढळले आहेत. या वर्षभरात शहरात डेंग्यूचे ३९३ संशयित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर चिकुनगुनियाचे ९ रुग्ण वर्षभरात आढळले आहेत.

डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी महापालिकेकडून (Pune Municipal Corporation – PMC) ५६० निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजाविण्यात आली असून, १ लाख ६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

“सदाआनंदनगरमधील घरांची तपासणी आरोग्य विभागाने केली. तिथे नळाचे पिण्याचे पाणी चांगले असल्याचे आढळून आले. मात्र, इमारतीच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी आढळून आले. याप्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.” अशी माहिती डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका यांनी दिली आहे.

Related Posts