IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘विरोधक बावचळे असून ते वेगवेगळ्या प्रकाराचा अजेंडा सेट करणे, वेगवेगळे विधाने करणे, षडयंत्र करणं असे प्रकार करतायेत’

by sachinsitapure

पुणे :  – Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीची (Pune Lok Sabha) रणधुमाळी सुरू आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त खासदार आपल्याच पक्षाचे निवडून येथील, असा दावा केला जात आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रात 30 ते 35 जागा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जिंकेल असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), जगदीश मुळीक (Jagdish Mulik), मकरंद देशपांडे, दत्ता गायकवाड, गणेश बिडकर (Ganesh Bidkar), बाबुराव चांदेरे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, परशुराम वाडेकर, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, मयुरी कोकाटे, लहू बालवडकर उपस्थित होते.

युवकाच्या संकल्पपत्राचे या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून हे संकल्पपत्र तयार करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या सगळीकडे भाजपमय वातावरण आहे. भाजपला निवडून द्यायचे असे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आमचे विरोधक बावचळे असून ते वेगवेगळ्या प्रकाराचा अजेंडा सेट करणे, वेगवेगळे विधाने करणे, षडयंत्र करणं असे प्रकार पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यांनी काही केले तरी भाजपा जिंकेल असा आम्हाला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी यांच्या समवेत 24 पक्षांची खिचडी

महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. पुढची पाच वर्षे जनसामान्यांच्या आशा आकांक्षा, सुरक्षा, विकास यांची विचार करण्याची निवडणूक आहे. एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या समवेत वेगवेगळे 18 पक्षांची महायुती आहे. राहुल गांधी यांच्या समवेत 24 पक्षांची खिचडी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते पुढे म्हणाले, त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. 24 नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. 140 कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. सबका साथ सबका विकास मोदीजी करीत आहेत. विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे.

मोदींनी अनेक योजना आणल्या

मोदीजींमुळे 25 कोटी लोक गरीबी रेषेखाली आले. 20 कोटी लोकांना घरे मिळाली, 50 कोटी लोकांना शौचालये, 60 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी, 80 कोटी लोकांना रेशन, पुढील पाच वर्षे रेशन देणार, 55 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजना, 63 कोटी लोकांना मुद्रा कर्ज, त्यात 50 टक्क्यांहून जास्त मुली आणि महिला आहेत, 20 लाखापर्यंतचे लोन आता देणार, 80 लाख बचतगटांना निधी दिला, 10 कोटी लखपती दिदी होतील, बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजना आणली, आधुनिक प्रशिक्षण दिले, ज्येष्ठ नागरिकांना सर्व उपचार मोफत केले, वयोश्री योजना आणली, दिव्यांगासाठी कृत्रिम पाय आणि हाताच्या फॅक्टरी भारतात उघडल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती दिली.

मोदींमुळे पुण्यात मेट्रो धावली

मोदीजींनी पहिल्यांदा शहराची काळजी केली, शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा आधी मात्र गेल्या पन्नास वर्षांत सरकारने शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी आले पण राहायला जागा, पिण्याला पाणी नव्हते, सांडपाणी व्यवस्था नव्हती. घनकचरा व्यवस्थापन एसटीपीसाठी पुण्याला निधी दिल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी मोदींनी निधी दिला. पुण्यात मेट्रो धावतेय. त्याचे नेटवर्क तयार होतय. प्रदूषण टाळले जातय, मेट्रोसह इलेक्ट्रिक बस आल्या. सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस पुण्यात आहेत. स्मार्ट सिटीचे व्हिजन आहे. मोदीजींच्या निधीतून कामे केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांना पक्की घरे दिली. त्यामुळे सुनियोजित शहर तयार होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बापट साहेबांनी चांगले काम केले

2014 पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले. अजित पवार यांच्या एअरपोर्ट, रिंगरोड यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. मॅन्युफॅकचरिंग आयटी हब आहे. देशातील सर्वोत्तम शहर बनण्याची ताकद पुण्यात आहे. आपण केवळ एक खासदार निवडुन देत नाही तर पुण्या करता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत. त्यांच्या माध्यमातून काम करायचे आहे. बापट साहेबांनी चांगले काम केले. त्यांचे काम पुढे न्यायचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेते

कोविडमध्ये अवस्था बिकट होती. काही देश भारत आपल्याकडे व्हॅक्सिनसाठी येईल म्हणून वाट पाहात होते. मोदींनी शास्त्रज्ञ एकत्र केले, रॉ मटेरियल दिले, परदेशातून आवश्यक घटक आणले, 140 कोटी लोकांना व्हॅक्सिन दिले. मॉरिशस सारख्या 100 देशांना लस दिली. जे म्हणतात नरेंद्र मोदी हा आमचा नेता आहे. आपले पंतप्रधान जागतिक नेते झाले आहेत. एक मजबूत भारत मोदीजींच्या मुळे झाला आहे. बॉम्बस्फोट आधी व्हायचे केवळ अमेरिकेत जावून पुरावे द्यायचे. मोदी पंतप्रधान झाल्यावर बॉम्बस्फोट झाले. आपण सर्जिकल स्टाईक केला. जगात पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो. त्यातून संधी, रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे.

मुरलीधर मोहोळ यांना मत म्हणजे मोदींना मत

लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार आहे. जो मतदान करतो त्याला नैतिक अधिकार आहे. मतदान ही देशसेवा आहे. तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. कमळाचे बटन दाबा, मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल. तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील मोदीजी मजबूत भारत बनवतील, असे फडणवीस यांनी म्हटले.

प्रशासनावर अंकुश ठेवण्याची गरज -मेधा कुलकर्णी

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ॲमेनिटी स्पेसवर विविध सुविधा झाल्या. अतिशय वेगाने मेट्रोची वाढ होते आहे. चांदणी चौकाचे काम पूर्ण होऊ शकले. पायाभूत सुविधांसाठी निधी दिलेला आहे. पाणीपुरवठ्याची अपुरी सोय आहे. रोज टँकरने पाणी मागवावे लागते. सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प गंभीर आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना मतदानाच्या रुपाने आशिर्वाद मिळेल असा विश्वास वाटतो.

मोदीजींनी जे आश्वासन दिले ते पूर्ण केले – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, गिरीश बापट यांना 3 लाख 23 हजार मतांचे मताधिक्य होते. ते वाढविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी देशाच्या निवडणुकीत मतदान घडवावे लागेल. मोदीजींनी समाजाच्या विविध घटकांसाठी काम केले. 2014 ला 18 कोटी मतदान झाले तर 2019 ला 23 कोटी मतदान झाले. या वेळेला 30 कोटी मतदान होईल असे राजकीय जाणकार सांगतात. कारण आपल्याला मोदीजींनी जे आश्वासन दिले ते पूर्ण केले. प्रत्येक योजनेत 141 कोटी लोकांना सहभागी करून घेतले. दारिद्र्य रेषेखालील 25 टक्के लोकांना बाहेर आणले. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. विक्रमी मताधिक्याने मुरलीधर मोहोळ यांना विजयी करावे.

Pune Cyber Crime News | पुणे : तपास यंत्रणांची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची 2 कोटींची फसवणूक

Related Posts