IMPIMP

Dighi Accident News | पावसापासून बचावासाठी अंगावर बॅनर घेतला अन् दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला; जाणून घ्या

by sachinsitapure
Accident

दिघी: Dighi Accident News | सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे मोलमजुरी करणारे मजूर मोकळ्या मैदानात आसरा घेताना पावसापासून बचाव करण्यासाठी अंगावर बॅनर, प्लास्टिक घेतात. अशाच प्रकारे अंगावर बॅनर घेतल्याने अज्ञात वाहनचालकाला बॅनरखाली झोपलेली व्यक्ती न दिसल्याने डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना सोमवारी (दि.१) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. कपिल विलास अंकुरे (२१, रा. बोरी, परभणी) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दिघी पोलिस ठाण्याचे (Dighi Police Station) वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी बसथांब्याजवळील मोकळ्या मैदानात एकाचा खून झाला असल्याची माहिती अशोक नावाच्या व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षास दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना एका बॅनरखाली कपिलचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्याला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही मारहाणीच्या खुना नव्हत्या. मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे.

Related Posts