IMPIMP

Dr Ajay Taware-Sassoon Hospital | डॉ. अजय तावरेचे इतरही कारनामे बाहेर येऊ लागले, मृत बाळंतिणीच्या रक्ताचा दिला होता चुकीचा अहवाल, मुलानी-शेख कुटुंब आले समोर

by sachinsitapure

पुणे : Dr Ajay Taware-Sassoon Hospital | पुणे पोर्शे कार अपघातात (Pune Porsche Car Accident Case) अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमूने (Swapping Blood Sample) ससूनमधील ज्या दोन डॉक्टरांनी बदलले त्यापैकी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याचे कारनामे हळहळु बाहेर येऊ लागले आहेत.

पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. अजय तावरे आणि इतर दोघांनी बिल्डर विशाल अग्रवालकडून (Builder Vishal Agarwal) तीन लाख रूपये घेतले होते. मात्र, डॉ. तावरे याने असेच प्रकार यापूर्वीही केल्याचे आता समोर येऊ लागले आहे.

शिरुरमधील शेख कुटुंबियांसोबत (Shirur Shaikh Family) देखील २०१८ मध्ये तावरेनी ब्लड रिपोर्ट बदलल्याचा प्रकार केल्याचे शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबातील रेहाना शेख यांचा ११ ऑगस्ट २०१८ला प्रसूती नंतर मृत्यू झाला. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवले नसल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर रेहाना यांचे भाऊ आणि पती यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रेहानाचा जीव गेल्याचा आरोप केला होता. त्यावेळी डॉक्टर अजय तावरेच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली, मात्र तावरेनी २७ नोव्हेंबर २०१८ला डॉक्टरांच्या बाजूने अहवाल दिला गेला.

यानंतर मुलानी-शेख कुटुंबाने ब्लड बँकेतून २१ जानेवारी २०१९ रीतसर माहिती घेतली, तेंव्हा डॉक्टर तावरेनी पैशांसाठी चुकीचा अहवाल दिल्याचे या दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आले. तावरेच्या या हव्यासापोटी मुलानी आणि शेख कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही. न्यायालयीन खटला सुरू आहे.

डॉ. तावरे याचे आणखी एक जुने प्रकरण यानिमित्ताने पुढे आल्याने पोर्शे कार अपघात प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. आता पोलीस या प्रकरणाची पण दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Posts