IMPIMP

Dr Shrihari Halnor On Dr Ajay Taware | डॉ. अजय तावरेंच्या दबावामुळेच रक्ताचे नमुने बदलल्याचा डॉ. श्रीहरी हळनोरचा खुलासा

by sachinsitapure

पुणे: Dr Shrihari Halnor On Dr Ajay Taware | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Kalyani Nagar Accident) आरोपी मुलाच्या रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार (Blood Sample Temparing) केल्याबाबत ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) दोन डॉक्टरांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. (Porsche Car Accident Pune)

कल्याणीनगर हायप्रोफाइल अपघात प्रकरणात गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) रक्त बदलल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी पहाटेच ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यानुसार पोलिस नेमके काय घडले, याची माहिती घेत आहेत.

मुलाचे रक्ताचे नमुने देण्याच्या बहाण्याने तीन व्यक्ती ससून रुग्णालयात उपस्थित होत्या. त्याबाबत पोलिसांचा बारकाईने तपास सुरु आहे.

विशाल अगरवाल आणि डॉ. तावरे यांचा फोनवरून संपर्क झाला होता त्यावेळी डेड हाऊसचा शिपाई अतुल घटकांबळे हा मध्यस्थी असल्याचे समोर आले होते. त्यात आता आणखी सखोल तपास केल्यानंतर अतुल यालादेखील एक व्यक्ती कारमधून ससून रुग्णालयात भेटण्यास आली होती.

ती व्यक्ती अतुल याला भेटली आणि त्याने अतुलकडून ससूनला मॅनेज करण्यासाठी काय करावे लागेल किंवा कोण करून देईल, याची माहिती घेतली.

अतुलने डॉ. तावरेचे नाव सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने अतुलकडून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर विशाल अगरवाल आणि डॉ. तावरे यांचा संपर्क झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

रक्ताचे नमुने देण्याच्या बहाण्याने तीन व्यक्ती ससून रुग्णालयात उपस्थित होत्या. त्याबाबत पोलीस आता कसून तपास करीत आहेत.

डॉ. तावरे आणि विशाल अगरवाल यांचे फोनवर बोलणे झाल्यांनतर मला रक्ताचे नमुने बदल्ल्यांसाठी डॉ. तावरे यांनी प्रेशर केल्याचे डॉ. हळनोर यांनी सांगितले.

“माझ्या मनाला ते पटत नव्हते, माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते. त्यामुळे दोन दिवस झोपू शकलो नाही” असे हळनोर आता म्हणत असल्याचे समोर येतेय.

Related Posts