IMPIMP

Dr Vinayak Kale – Sassoon Hospital | पुण्यातील ब्लड सॅम्पलची अदलाबदली, ससूनचे डीन डॉ. विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं

by sachinsitapure

पुणे :  – Dr Vinayak Kale – Sassoon Hospital | पुण्यातील कल्याणी नगर अपघातातील (Kalyani Nagar Accident) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पल मध्ये अदलाबदली (Swapping Blood Sample) केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तिघांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आता बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासात डॉ. काळे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे आता त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव मनोहर बंदपट्टे यांनी बुधवारी (दि.29) काढले आहेत.

बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. तसेच संस्थाप्रमुख म्हणून डॉ. काळे यांनी याप्रकरणावर योग्य ते नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे डॉ. विनायक काळे यांना या प्रकरणात संस्थाप्रमुख म्हणून त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Related Posts