IMPIMP

Eknath Shinde On Uddhav Thackeray | पंतप्रधानांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्याही भाषणात भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून टीका, शेतकरी, रोजगार या विषयांना बगल

by sachinsitapure

ठाणे : Eknath Shinde On Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्याचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान राज्यात सभा, रोड शो घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणात भारत-पाकिस्तान, हिंदु-मुस्लिम असे मुद्दे सातत्याने येत आहेत. आता त्यांचेच अनुकरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचे दिसत आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी वर्गाचे प्रश्न यांना बगल दिल्याचे दिसत आहे. कल्याण येथील पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी याच विषयावरून विरोधकांवर टिकास्त्र डागले.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, इंडिया आघाडी (India Aghadi) पराभवाच्या भीतीने भरकटली आहे. ठाकरे गटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटाचा (Mumbai Bomb Blast ) आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीत उतरविले आहे. त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantra Veer Savarkar) अपमान करणारे, बाळासाहेबांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असे म्हणणारे समाजवादी, काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असे सांगणारे फारुख अब्दुल्ला यांना कसे चालतात? बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील.

विरोधकांवर अशा पद्धतीने हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मोदींचे मात्र जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर मोदींची प्रचंड श्रद्धा आहे. त्यांनी नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्रा उमटवली. सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, त्यांच्या कार्यकाळात शिवजयंती साजरी झाली, शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण केले.

दरम्यान, निवडणुकीतील विजयाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जनतेच्या हृदयातले पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये (Kalyan Lok Sabha) पाऊल पडल्याने भिवंडी (Bhiwandi Lok Sabha) , कल्याण आणि ठाणेदेखील (Thane Lok Sabha) आपण जिंकल्यात जमा आहे असे वातावरण तयार झाले आहे.

Kothrud Pune Crime News | पुणे : सराईत चोरट्याला कोथरुड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह 3 दुचाकी जप्त

Related Posts