IMPIMP

Encroachment Action In Lonavala | भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने अनधिकृत टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

by sachinsitapure

लोणावळा : Encroachment Action In Lonavala | भुशी डॅम परिसरात (Lonavala Bhushi Dam) धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील अनधिकृत टपऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे.

भुशी डॅम दुर्घटनेनंतर लोणावळा नगरपरिषद (Lonavala Nagar Parishad) आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. भुशी डॅमजवळ असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. भुशी डॅमजवळ अनेक खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. या सर्व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लोणावळ्यात दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चोवीस तास उलटायच्या आतच प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अनधिकृत अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे. भुशी डॅम परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिले.

त्यामुळे याठिकाणी सायंकाळी सहा नंतर पर्यटकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उगारला जाईल असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.

Related Posts