IMPIMP

Ganesh Satav Birthday | युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

by sachinsitapure

पुणे :  – Ganesh Satav Birthday | युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. गणेश सातव पाटील मित्र परिवार केसनंद, सरपंच प्रमोद हरगुडे व युवा सेना पुणे जिल्हा मित्र परिवाराच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.

नुकत्याच पुण्यात झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण (Pune Porsche Accident Case ) आणि पुण्यात झालेल्या ड्रग्स पार्टी (Pune Drugs Party) या दोन्ही घटनांवर ताबडतोब ॲक्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी कारवाईचे आदेश देऊन अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी व पुण्याची संस्कृती टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. दुग्धअभिषेक बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील व केसनंद गावचे सरपंच प्रमोद हरगुडे (Pramod Hargude) पाटील यांनी केला.

युवकांच्या व पुणेकरांच्या वतीने उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांचे मनापासून अभिनंदन केले, शंभूराज देसाई यांच्यासारखा मंत्री उत्पादन शुल्क विभागाला लाभला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Posts