IMPIMP

Hoarding Collapse In Moshi Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, मोशीत लोखंडी होर्डिंग कोसळले (Video)

by sachinsitapure

पिंपरी : – Hoarding Collapse In Moshi Pimpri Chinchwad | मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून (Hoarding Collapse In Ghatkopar Mumbai) मोठी दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि.16) घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग सुदैवाने रस्त्यावर पडलं नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली आहे. हे होर्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत हे अद्याप समजू शकले नाही.

आज दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नाही.

दरम्यान, घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवारपासून (दि.15) सुरुवात केली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगधारक मालकांनी दोन दिवसामध्ये आपले अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यास पालिकेने सांगितले आहे. याच दरम्यान मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

Pune News | डेंग्यूला दूर हटविण्यासाठी परिसरात डासांची उत्पत्ती रोखा; आरोग्य विभागाचे आवाहन

Related Posts