IMPIMP

Indrayani River Foams | आळंदी : मुख्यमंत्री शिंदेंनी वचन दिलं, …आणि काही तासात पुन्हा प्रदूषणाने फेसाळली इंद्रायणी, भाविकांमध्ये प्रचंड नाराजी

by sachinsitapure

आळंदी : Indrayani River Foams | आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले. शिंदे म्हणाले इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु, मुख्यमंत्र्यांचे हे वचन काही तासातच फोल ठरले आहे. कारण केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी ऐन पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान फेसाळली आहे.

इंद्रायणी प्रदुषणामुळे फेसाळल्याने येथे जमलेले हजारो वारकरी प्रचंड नाराज झाले आहेत. आश्वासन दिल्यानंतर काही तासातच ते फोल ठरल्याने सरकार आणि प्रशासनाची पोलखोल झाल्याचे दिसून आले. कोणतेही आदेश प्रशासनाला यासंबंधी दिले गेले नसल्याने ऐन पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान हा प्रकार घडला आहे, तोही मुख्यमंत्री आश्वासन देऊन गेल्यानंतर घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीतील गांधीवाडा आजोळघरी पहिला मुक्काम झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. वारकऱ्यांशी संवाद साधला. फुगडी खेळण्याचा आनंद ही घेतला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीची पाहणी केली. इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून इंद्रायणी स्वच्छ करण्याच वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, अवघ्या काही तासातच पुन्हा केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी फेसाळल्याचे आज दिसून आले.

Related Posts