IMPIMP

JM Road Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनिकल पार्किंगमध्ये शिरले चोर, पकडण्यासाठी पोलिसांचा थरार, पण…

by sachinsitapure

पुणे : JM Road Pune Crime News | काल पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर (Jangli Maharaj Road Pune) चोर-पोलिसांचा थरार अनेकांनी अनुभवला. येथील मॅकेनिकल पार्किंगमध्ये चोर शिरल्याचे समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर चोरांना पकडण्याचा थरार सुरू झाला.

जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनिकल पार्किंगमध्ये घुसलेल्या या ३ ते ४ चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावली. चोर पार्किंगमध्ये इमारतीवर चढले असल्याने त्यांना पकडण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. इतके करूनही ते हातात येत नव्हते. अखेर पोलीस पुन्हा खाली आले आणि चोरांना खाली येण्याचे आवाहन करू लागले.

चोर पकडण्यासाठी सुरू असलेली पोलिसांची ही धडपड पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी सर्व प्रयत्न केले, परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांना हात हलवत माघारी यावे लागले.

जंगली महाराज रस्त्यावरील हे पुणे महापालिकेचे मेकॅनिकल पार्किंग सध्या बंद आवस्थेत आहे. म्हणूनच या ठिकाणी चोर शिरले होते. पालिकेने सुमारे १५ वर्षापूर्वी दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेले हे ठेकेदाराला दिले होते, मात्र अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने ते बंद केले आहे.

Related Posts