IMPIMP

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाचा 140 कोटींचा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा, योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याला यश

by sachinsitapure

पुणे : – Katraj-Kondhwa Road | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी 140 कोटी रुपये महापालिकेला (Pune Municipal Corporation-PMC) देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या अचारसंहितेमुळे महापालिकेला निधी मिळाला नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनी याबाबत पाठपुरावा केला. अखेर सोमवारी (दि.1 जुलै) हा निधी शासनाकडून महापालिकेकडे वर्ग करण्यात आला.

कात्रज रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 210 कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात या रस्त्याचे काम बंद झाले होते. दरम्यान, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर योगेश टिळेकर यांनी राज्य सरकारकडे भूसंपादनाच्या निधीची मागणी केली होती. त्याला जानेवारी 2023 मध्ये मंजूरी देण्यात आली. त्यानंतर या कामाला गती मिळाली.

या कामासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये 200 कोटींची तरतूद करण्यात आली. राज्य सरकारने या कामासाठी लागणाऱ्या निधीचा 15 मार्च 2024 रोजी शासन निर्णय काढला. मात्र, लोकसभेच्या आचारसंहितेच्या दोन दिवस आधी शासन निर्णय मंजूर झाल्याने आणि त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे तीन महिने विलंब झाला होता. आचारसंहिता संपताच योगेश टिळेकर यांनी याबाबर शासन दरबारी पाठपुरवा केला. अखेर सोमवारी 140 कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. रस्तारुंदीकरणातील बाधित जागा मालकांनी योग्य मोबदला घेऊन लवकरात-लवकर जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी अशी विनंती योगेश टिळेकर यांनी जागा मालकांना केली आहे.

Related Posts