IMPIMP

Kharadi-Lonikand Pune Crime News | पुणे: भांडण झाल्याने मामाच्या घरी निघाली, रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

by sachinsitapure

पुणे : – Kharadi-Lonikand Pune Crime News | भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे मामाकडे निघालेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत रिक्षामध्ये अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितले तर पळवून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) 25 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 28 जून रोजी रात्री दहाच्या सुमारास आव्हाळ वाडी फाटा ते खराडी या दरम्यान सहा सिटर रिक्षामध्ये घडला आहे.

याबाबत 32 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश रावसाहेब भालके Dinesh Raosaheb Bhalke (वय-25 रा. वडगाव शेरी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या मुलीने भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरुन घरात भांडण केले. या भांडणामुळे तीने मामाकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली.

मामाकडे जात असताना फिर्य़ादी व पिडीत मुलीच्या ओळखीचा आरोपी दिनेश भालके तिला भेटला. पिडित मुलीने आरोपीकडे मामा कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने तुझा मामा खांदवेनगर येथे असल्याचे खोटे सांगून रिक्षात बसवले. रिक्षातून जात असताना आरोपीने मुलीला जबरदस्तीने किस केला. तसेच तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. याबाबत घरात कोणाला काही सांगितले तर मी तुला पळवून नेऊन लग्न करीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts