IMPIMP

Kondhwa Pune Crime News | पुणे: महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले व्हायरल, कोंढवा परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे :  – Kondhwa Pune Crime News | महिलांचे सोशल मीडियावरुन फोटो घेऊन ते मॉर्फ करुन व्हायरल (Morph Photo Viral) करण्याचे प्रकार घडत आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचे मॉफ केलेले अश्लील फोटो (Obscene Photo) पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. तसेच पती व महिलेमध्ये गैरसमज निर्माण केले. हा प्रकार 25 जून ते 30 जून या कालावधीत घडला आहे.

याबाबत 36 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन दोन मोबाईल धारकांवर आयपीसी 354(ड), 500, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईल धारकाने 25 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पती, मित्र व नातेवाईक यांना पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन बदनामी केली.

तसेच फिर्य़ादी व त्यांच्या पतीमध्ये गैरसमज निर्माण केला. त्यानंतर 29 जून रोजी आरोपीने व्हॉट्सअॅपवर व्हाईस कॉल करुन फिर्य़ादी यांना पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. फिर्य़ादी यांनी याला नकार दिला असता आरोपीने वारंवार फोन करुन पुणे स्टेशन येथे भेटायला बोलवले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग केला. तसेच महिलेसोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याची घटना घटना घडली आहे. ही घटना 29 जून रोजी रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान कॅनल रोड व स्वामी नारायण मंदीराच्या (Swami Narayan Temple) समोरील महामार्गावर घडली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Molestation Case)

Related Posts