IMPIMP

Lonikand Police Raid On Gambling Den | पुणे : लोणीकंद पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

by sachinsitapure

पुणे :  – Lonikand Police Raid On Gambling Den | पुण्यातील वाघोली (Wagholi) परिसरात एका इमारतीच्या टेरेसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई फडई चौकातील अमोल सातव यांच्या इमारतीच्या टेरेसवरील खोलीत केली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी काहीजण 13 पानी जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

फडई चौकातील इमारतीच्या टेरेसवरील खोलीत 13 पानी जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आशिष लोहार याठिकाणी छापा टाकला असता जुगार चालक व इतर चार जण हे 13 पानी जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, चार चाकी वाहन व जुगार खेळण्याचे साहित्य एकूण 4 लाख 43 हजार 810 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी, तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप तिकोने, सागर जगताप, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, अमोल ढोणे यांच्या पथकाने केली.

Related Posts