IMPIMP

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणीवर बलात्कार

by sachinsitapure

पुणे :  – Lonikand Pune Crime News | विवाहित महिलेसोबत ओळख करुन तिच्यासोबत जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. हा प्रकार पिडित महिलेच्या घरात ऑक्टोबर 2023 पासून 30 एप्रिल 2024 या कालावधीत वारंवार घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 22 वर्षीय विवाहित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विनोद महादू शिंदे Vindo Mahadu Shinde (वय-24 रा. वाघोली, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323,504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे लग्न झाल्याचे लपवून ठेवत पिडित महिले सोबत ओळख करुन जवळीक साधली. पिडितेचे लग्न झाल्याचे माहित असताना तिला जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला मारहाण करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पतीला मारहाण करुन महिलेचा विनयभंग

पुणे : घरासमोर साफसफाई करताना पाणी वाहत गेल्याने एका महिलेला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. महिलेसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला (Molestation). तसेच महिलेच्या पतीला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.5) सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ताडीवाला रोड येथे घडला. याप्रकरणी पिडीत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास कांबळे, संतोष कांबळे यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts