IMPIMP

Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ॲक्शन प्लॅन तयार; ‘या’ 16 नेत्यांवर मोठी जबाबदारी

by sachinsitapure

पुणे: Maharashtra Assembly Elections 2024 | राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. भाजपाला २८ जागा लढवून अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही भाजपाची कानउघाडणी करण्यात आली. तसेच संघाच्या मुखपत्रातूनही भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. (BJP Action Plan)

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्यासाठी पुण्यात आमदारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये, यासाठी संघाने पावले उचलली आहेत.

त्यांनतर आता लोकसभेतील पराभवानंतर भाजपनेही ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहेत.

होमग्राऊंड राखू न शकलेल्या विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीपैकी भाजपने २८, शिंदे गटाने १५ आणि अजित पवार गटाने ४ जागा लढवल्या होत्या. त्यातील भाजपला ९, शिंदे गटाला ७ आणि अजित पवार गटाला एकाच जागेवर विजय मिळवता आला.

महायुतीने गमावलेल्या ३३ मतदारसंघांचा यानिमित्ताने आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय जिंकलेल्या जागांवरही भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात आले आहेत. २२ जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षश्रेष्ठींना हा अहवाल द्यावा लागणार आहे. बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे, बारामती मंगलप्रभात लोढा तर श्रीकांत भारतीय हे चंद्रपुरचा आढावा घेणार असल्याचे समजते.

भाजपाने कोणत्या नेत्यांवर ही जबाबदारी दिली आहे?

१) जालना – चंद्रकांत पाटील
२) रामटेक – खा.अनिल बोंडे
३) अमरावती – आशिष देशमुख
४) वर्धा – आ. प्रवीण दटके
५) भंडारा-गोंदिया – रणजीत पाटील
६) यवतमाळ-वाशिम – आ.आकाश फुंडकर
७) दिंडोरी – विजयाताई रहाटकर
८) हिंगोली- आ. संजय कुटे
९) उत्तर-पश्चिम मुंबई – सुनील कर्जतकर
१०) दक्षिण मुंबई – माधवी नाईक
११) उत्तर-मध्य मुंबई- हर्षवर्धन पाटील
१२) उत्तर-पूर्व मुंबई – आ. राणा जगजितसिंह
१३) मावळ – आ. प्रवीण दरेकर
१४) अहमदनगर- खा. मेधा कुलकर्णी
१५) माढा – आ. अमित साटम
१६) भिवंडी – गोपाळ शेट्टी

Related Posts