IMPIMP

Muddy Water Supply In Pune | गोखलेनगर, जनवाडीत दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा

by sachinsitapure

पुणे: Muddy Water Supply In Pune | नळातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने गोखलेनगर (Gokhale Nagar), जनवाडी (Janwadi) परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाना मस्जिद समोरील नाना टी हॉटेल, ओटा घर, एकता सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात नळाला आठ ते दहा दिवसापासून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.

दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता रहिवासी शारुख शेख म्हणाले, ” जलवाहिन्या खूप जुन्या झाल्या आहेत. त्या ड्रेनेज लाईन मधून येत असल्याने ज्याठिकाणी जलवाहिन्या खराब झाल्या आहेत त्याठिकाणाहून ड्रेनेजचे पाणी जलवाहिन्यात येते तेच पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी येते. पाण्याची दुर्गंधी येत असून पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते.”

गोखलेवाडी, जनवाडी परिसरातील ओटा घर व एकता सोसायटीमध्ये नागरिकांना गढूळ पाणी येत असल्याची तक्रार येत आहे. अधिकाऱ्यांना नम्र विनंती की याची लवकरात लवकर दखल घ्यावी. नागरिकांच्या आरोग्याशी हलगर्जीपणा केल्यास शिवसेनेकडून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रवीण डोंगरे यांनी दिला आहे.

Related Posts