IMPIMP

Murlidhar Mohol | धंगेकरांची जादू चाललीच नाही! पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं; मुरलीधर मोहोळ 86 हजार मतांनी विजयी

'ही' आहेत मोहोळ यांच्या विजयाची कारणं, जाणून घ्या राजकीय कारकीर्द

by sachinsitapure

पुणे : – Murlidhar Mohol | राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Election Results 2024) भाजपच्या (BJP) मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मुरलीधर मोहोळ 86 हजार 369 इतक्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव केला आहे. मुरलीधर मोहोळ यांना पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळालं आहे. या निवडणूकीत धंगेकरांची नाही तर मुरलीधर मोहोळ यांची जादु चालली. मोहोळ यांची जादू चालणार नाही, असं रवींद्र धंगेकर म्हणाले होते. मात्र मोहोळ यांनी विजय खेचून आणला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे (Vasant More) निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी धंगेकर आणि मोहोळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. चार फेऱ्यानंतर मोहोळ यांनी आघाडी घेतली. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर पुणे लोकसभेच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना चितपट केलं. सुरुवातीला धंगेकर यांनी आघाडी घेतली मात्र, त्यानंतर ते पिछाडीवर पडले.

कसब्यातून मोठी आघाडी

चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी 27 हजार 598 मतांची आघाडी घेतली होती. मोहोळ यांनी धंगेकरांच्या कसबा मतदार संघातून 5131 मतांची आघाडी घेतली होती. मोहोळ यांना कसब्यातून 17 हजार 751 मते तर रवींद्र धंगेकरांनी 12 हजार 620 मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर मोहोळ 34 हजार 851 मतांनी आघाडीवर होते. या फेरी अखेर धंगेकर यांना 1 लाख 11 हजार 889 मते मिळाली. तर मोहोळ यांना 1 लाख 45 हजार 740 मते मिळाली होती. सहाव्या फेरीअखेर मोहोळ यांनी 37 हजार 693 मतांनी आघाडी घेतली. साव्या फेरी अखेर 45 हजार 419 तर आठव्या फेरीनंतर मोहोळ हे तब्बल 46 हजार 469 मतांनी आघाडीवर होते. 10 व्या फेरीनंतर मोहोळ यांनी 50 हजारांची आघाडी घेतली. यानंतर त्यांचा लीड 70 हजारांच्या आसपास गेला. अखेल एवढा लीड तोडणे धंगेकरांसाठी आव्हान होते. अखेर मुरलीधर मोहोळ 86 हजार 369 मतांच्या फरकांनी विजयी झाले.

मोहोळ यांच्या विजयाची कारणे

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रचारासाठी पुण्यात आले
2. भाजपने नेत्यांची मोठी फळी कामाला लावली होती. सर्वच नेत्यांचा मोहोळ यांना पाठिंबा होता.
3. निवडणूक प्रचाराचं योग्य नियोजन
4. राज ठाकरे यांची प्रचारसभा
5. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते.
6. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथक यांनी दिलेला जाहीर पाठिंबा

मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कारकीर्द

– पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी, 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये नगरसेवक झाले
– 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.
– उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद
– पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018
– संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018
– संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018
– सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018

Related Posts