IMPIMP

Murlidhar Mohol Kasba Rally | भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात मुरलीधर मोहोळ यांची रॅली, तरुण मतदारांचा जल्लोष

by sachinsitapure

पुणे :  – Murlidhar Mohol Kasba Rally | पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला (Murlidhar Mohol Bike Rally) तरुण मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुण मतदारांचा जल्लोष पाहायला मिळाला. तसेच नागरिकाकडून मुरलीधर मोहोळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

राष्ट्रभूषण चौकातून (Rashtra Bhushan Chowk) प्रारंभ झालेली ही रॅली पंचहौद चौकातून (Panch Haud Chowk) पुढे सरळ शितळादेवी चौक (Shitaladevi Chowk), सुभेदार तालीम (Subhedar Talim), नेहरू चौक (Nehru Chowk Pune), सुभान शहा दर्गा (Subhansha Dargah), फुलवाला चौक (Fulwala Chowk), कस्तुरे चौक (Kasture Chowk Pune), जानाई मळा (Janai Mala), लोहियानगर पोलीस चौकीमार्गे (Lohiya Nagar Police Chowki) समताभूमीकडे (Samatabhumi) गेली. त्यानंतर चांदतारा चौक (Chand Tara Chowk), घोरपडे पेठ पोलिस चौकी (Ghorpade Peth Police Chowki), दलाल चौक (Dalal Chowk Pune), मिठगंज पोलीस चौकी (Mithganj Police Chowki), मोमीनपुरा (Mominpura Pune), ननावरे चौक (Nanaware Chowk Pune), कर्मशाळा कोठीमार्गे (Karmashala Koti Pune) मार्गस्थ झाली आणि शेवटी एकबोटे कॉलनी (Ekbote Colony) येथे तिचा समारोप झाला.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Vidhan Sabha) दुसऱ्या भागातील रॅलीत सहभागी झालो. इथंही तरुण मतदारांचा जल्लोष कमी नव्हताच. इतर रॅली प्रमाणे भेटायला येणाऱ्या मतदारांचा उत्साह तसूभरही कमी नव्हता. प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून काहीतरी सांगायचं होतं. काहींच्या समस्या होत्या, तर काहींना फक्त प्रेमानं भेटायचं होतं. सर्वांचंच म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना आश्वस्त केलं आणि त्यांचे प्रश्न खात्रीने मार्गी लावण्याची ग्वाहीही दिली. देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या विविध योजनांचं वारं वाहतंय, ते तसंच वाहू द्यावं आणि आपल्या शहराला, मतदारसंघालाही त्यातून अनेक गोष्टी मिळवता याव्यात, यासाठी आवर्जून मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Mohan Joshi Congress On BJP Sankalp Patra | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’ – मोहन जोशी

Related Posts