IMPIMP

Murlidhar Mohol | भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना राजपुत समाज सेवा विकास मंचचा जाहीर पाठिंबा

by sachinsitapure

पुणे :  – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे भाजप उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांना शहरातील विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातील 27 हिंदुत्ववादी संघटनांनी मुरलीधऱ मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यानंतर आता पुणे शहरातील राजपुत समाज सेवा विकास मंचने (Rajput Samaj Seva Vikas Manch) देखील मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र मंचाचे अध्यक्ष सुभाष परदेशी (Subhas Pardeshi) यांनी आज दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विश्वनेते आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि हिंदुत्ववादी सरकार भारतात येण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या संघटनेने तर्फे जाहिर पाठिंबा देत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, पद्मशाली समाज, पुणे शहरातील रिक्षाचालकांनी देखील मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिला आहे. मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध भागामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये तरुणाची संख्या लक्षणीय असून मोहोळ यांच्या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Vidhan Sabha) मुरलीधर मोहोळ यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुण मतदारांचा जल्लोष पाहायला मिळाला.

Related Posts