IMPIMP

Murlidhar Mohol | पुणे: भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना रिक्षा चालकांचंही पाठबळ!

by sachinsitapure

पुणे :  – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे भाजप उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातील 27 हिंदुत्ववादी संघटनांनी मुरलीधऱ मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यानंतर आता पुणे शहरातील रिक्षाचालकांनी देखील मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध भागामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये तरुणाची संख्या लक्षणीय असून मोहोळ यांच्या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

रिक्षाचालकांनी पाठिंबा दिल्यावर मुरलीधर मोहोळ म्हणाले, माझ्या पुणे लोकसभेसाठीच्या उमेदवारीला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असताना रिक्षाचालक हा समाजातील महत्त्वाचा घटकही पाठबळ देत आहे. रिक्षाचालकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास उपस्थित राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यावर मार्ग काढण्यासंदर्भात आश्वस्त केले. शिवाय गरीब कल्याण हा मुख्य अजेंडा असलेल्या मोदी सरकारला (Modi Govt.) पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी मतदानरुपी साथ द्यावी, असं आवाहनही केलं.

Pune Lok Sabha Election 2024 | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर

Related Posts