IMPIMP

गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द

by pranjalishirish
music festival of dagdusheth starting from gudipadva canceled this year

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच सन कार्यक्रमावर बंदी आली आहे. तर यंदा श्रीमंत दगडूशेठ Dagdusheth  हलवाई गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापनदिन आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या वर्षीचा संगीत महोत्सव आणि अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्था, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले आहे.

अनैतिक संबंधातून पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी, कोरोनानं मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण झाला पर्दाफाश

अनेक वर्षे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा संगीत महोत्सव होऊ शकला नाही. तर प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला संगीत महोत्सवाला सुरुवात होते. यंदाही पुण्यात कोरोनाने थैमान घातले असल्याने हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ Dagdusheth  हलवाई गणपती ट्रस्टने घेतला आहे. तसेच यंदाच्या वर्षी संगीत महोत्सव रद्द झाल्याने प्रत्यक्षपणे मिळणारा हा आनंद गणेशभक्तांना मिळणार नाही. परंतु, दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आणि इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्त भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकणार आहे.

Lockdown च्या विरोधात उदयनराजेंचे साताऱ्यात ‘भीक मांगो’ आंदोलन

दरवेळी प्रख्यात गायक व संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार श्रीधर फडके, गायिका आशा खाडिलकर यांसह कला, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे या कार्यक्रम महोत्सवात आयोजन केले जाते. तसेच अनेक नवीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येते. दरम्यान, धार्मिक विधी करण्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे https://seva.dagdushethganpati.com/fasttrack या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे.तसेच फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमातून २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.

Read More : 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts