IMPIMP

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : गुन्हे शाखेकडून तीन सराईत वाहन चोरांना अटक, पावणे सात लाखांच्या 14 दुचाकी जप्त (Video)

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Police), पुणे शहर (Pune City Police) आणि पुणे ग्रामीण परिसरात (Pune Rural Police) वाहन चोरी (Motor Vehicle Theft) करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना (Criminal On Police Record) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 6 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त करुन 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

शुभम अशोकराव लोंढे (वय-21), सचिन समाधान दळवी (वय-23 दोघे रा. खंडोबा मंदीराजवळ, आळंदी), शिवाजी भोसले (रा. आळंदी देवाची) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. ही कारवाई आळंदी बस स्टॉप (Alandi Bus Stop) येथे करण्यात आली. पोलीस आयुक्तालयातील उघडकीस न आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहित घेत असताना आळंदी बस स्टॉप येथे दोन जण चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमर कदम व गणेश कोकणे यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने आळंदी येथील बस स्टॉप परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले. आरोपींचा पूर्व इतिहास तपासला असता आरोपी अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली.

आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये बजाज पल्सर 1, हिरो स्प्लेंडर 12, बजाज अॅव्हेंजर -1 जप्त केल्या आहेत. आरोपींकडून आळंदी, वाळुंज (छत्रपती संभाजीनगर), महाळुंगे, लोणी काळभोर, शिक्रापूर, संगमनेर, आळेफाटा, चिखली पोलीस ठाण्यातील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, अमर कदम व समीर रासकर यांच्या पथकाने केली.

Aaditya Thackeray On BJP | अब की बार जनता भाजपला तडीपार करणार – आदित्य ठाकरे डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करावे असे आवाहन

Related Posts