IMPIMP

Pimpri Chinchwad Police MPDA Action | पिंपरी : देहुरोड परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Police MPDA Action | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार तपासून त्यांच्यावर मोका (MCOCA Action) व एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश पिल्ले याला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

आकाश अरमुगम पिल्ले (वय-24 रा. देहूरोड, पुणे) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने देहूरोड, किवळे परिसरात जीवघेण्या हत्यारांसह फिरताना जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत यासारखे 15 गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपीला यापूर्वी एक वर्षासाठी तडीपार केले होते. तरी देखील त्याने बेकायदेशिररित्या हद्दीत येऊन गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण केली होती.

आकाश पिल्ले याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आकाश पिल्ले याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये एक वर्षाकरीता येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही करावाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड, पोलीस अंमलदार अनिल जगताप, धिरज अंभोरे, शुभम बावनगर, स्वप्नील साबळे यांच्या पथकाने केली.

Related Posts