IMPIMP

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘पोर्शे गाडीतील चित्रीकरण तपासणार’ अतिरक्त पोलीस आयुक्तांची माहिती

by sachinsitapure

पुणे :  – Porsche Car Accident Pune | कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने चालवलेल्या मोटारीमधील कॅमेऱ्याने टिपलेले अपघाताचे चित्रीकरण तपासण्यात येणार आहे (Kalyani Nagar Accident Pune). यामुळे पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil IPS) यांनी दिली.

कल्याणी नगर येथे रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील पोर्शे कारने दोघांना उडविले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही पब (Pubs In Pune), घटनास्थळ आणि येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) सीसीटीव्ही चित्रीकरण (CCTV Footage) तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अल्पवयीन मुलाने मद्यपान केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आता पोलीस त्या आलिशान पोर्शे मोटारीतील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ च्या 85 जणांवर कारवाई

कल्याणी नगर भागातील घटनेनंतर वाहतूक शाखेने शहरातील हॉटेल्स, बार आणि पबच्या परिसरात मद्य सेवन करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी मंगळवारी एकाच दिवसात 85 जणांवर दंडात्मक कारवाई केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यावर भरधाव वेगात वाहन चारविणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असा इशारा मनोज पाटील यांनी दिला.

पब-बारच्या परिसरात नाकाबंदी

पुणे शहरातील परमीट रुम, पब, बारच्या परिसरात मध्यरात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे. विशेषत: शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री एक ते पहाटे तीन या कालावधीत ही नाकाबंदी करुन मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Related Posts