IMPIMP

Pune ACB Trap Case | पुणे: लाच घेताना तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

by sachinsitapure

पुणे :- Pune ACB Trap Case | खरेदी केलेली तुकडा बंदीची जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर होण्यासाठी व त्याप्रमाणे नोंदणीचा आदेश मंजूर करुन देण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुनाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई राजगुरुनगर-खेड तहसिल कार्य़ालयाच्या आवारात सापळा रचून केली. (Pune Bribe Case)

रमेश ज्योतीराम वाल्मिकी Ramesh Jyotiram Valmiki (वय-51) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी कुरुळे गावच्या हद्दीत तुकडा बंदीची जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर होण्याकरीता व त्याप्रमाणे नोंदणीचा आदेश मिळण्यासाठी तक्रारदार यांनी राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालयात रितसर अर्ज केला होता.

अव्वल कारकुन रमेश वाल्मिकी यांनी आदेश मंजूर करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी रमेश वाल्मिकी यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 20 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तहसिल कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना वाल्मिकी याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

Related Posts