IMPIMP

Pune News : हेमंत रासने यांची स्थायी समिती अध्यक्षपदी सलग तिसर्‍यांदा निवड; ‘महाविकास’चे नगरसेवक बंडू गायकवाड यांचा केला पराभव

by nagesh
manjushree khardekar-hemant rasane

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची निवड झाली आहे. रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नगरसेवक बंडू गायकवाड यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. हेमंत रासने यांची सलग तिसर्‍यांदा स्थायी समितीअध्यक्षपदी निवड झाल्याची महापालिकेच्या इतिहासात नोंद झाली आहे.

जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. हेमंत रासने हे शनिवार, नारायण आणि सदाशिव पेठ या मध्यवर्ती भागातून चवथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडूण आले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे हे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची मुदत संपण्याअगोदर तीन महिने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

manjushree-khardekar-hemant-rasane

manjushree-khardekar-hemant-rasane

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समितीतील ज्येष्ठ सदस्य असलेल्या हेमंत रासने यांना स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिली. रासने यांना २०२०- २१ या वर्षिचे अंदाजपत्रक सादर करण्याची तसेच त्याची अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली. मार्च २०२० मध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने रासने यांनाच पुन्हा उमेदवारी देत अध्यक्षही केले. दरम्यान, २०२१ मध्ये रासने यांचा समिती सदस्यपदाचा कार्यकाल संपत असताना पक्षाने पुन्हा त्यांना स्थायी समितीवर संधी दिली. एवढेच नव्हे तर अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. विशेष असे की नुकतेच रासने यांनी सादर केलेल्या २०२१-२२ या वर्षिच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने मान्यताही दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागीलवर्षी रासने यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. जवळपास ९ महिने सर्व विकासकामे ठप्प होती.
सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी झटत असताना पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या रासने यांच्या खांद्याला खांदा लावून प्रशासनाने काम केले.
या पार्श्‍वभूमीवर तसेच आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने इच्छुकांना बाजूला
सारत पुन्हा रासने यांनाच अध्यक्षपदी निवडले आहे. यामुळे पक्षात नाराजीचे वातावरण होते.
निवडणुकीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे,
विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांनी हेमंत रासने यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, सलग तिसर्‍यांदा स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झालेल्या हेमंत रासने यांनी येत्या वर्षभरात सर्व
पक्षीय नगरसेवक आणि प्रशासनाला सोबत घेउन अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणार.
पुणे शहरामध्ये खूप पोटेंशियल असून त्या माध्यमातून पुढील काही वर्षात पुण्याचा जगातील सर्वात चांगल्या
दहा शहरांच्या पंक्तीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे आश्‍वासन दिले.

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी’, लवकरच येतंय अमृता फडणवीसांचं नवं गाणं

Related Posts