IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेची अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी ‘अभय योजना’; जाणून घ्या दर

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पुणे महानगर पालिकेच्या (Pune Corporation) पाणीपुरवठा विभागाने (water supply department) उत्पन्न वाढविण्यासाठी 1 जून 2021 पूर्वीचे निवासी आणि व्यापारी आस्थापनांचे अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी अभय योजना (Abhay Yojana)राबवली जाणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेचे (Pune Corporation) पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar)यांनी दिली. तसेच यानंतर घेण्यात आलेल्या सर्व अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येईल, असेही पावसकर यांनी म्हटले आहे.

शहरातील शासकीय संस्था, कार्यालये, खासगी नळजोड असे एकूण कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठ्याची थकबाकी आहे. मात्र, गेले अनेक वर्षापासून ही थकबाकी वसूल होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे (Corona) महापालिकेच्या उत्पन्नाला गळती लागल्याने आता विविध मार्गांचा अवलंब महापालिकेकडून केला जात आहे. त्यामध्ये थकबकी वसुली करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी अभय योजना राबवण्यात येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तीन महिन्यांची मुदत

या योजनेत सहभागी होण्यासाठी अनधिकृत नळजोड असणाऱ्या नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत स्वारगेट (Swargate), सावरकर भवन (Savarkar Bhavan), एसएनडीटी (SNDT), चतु:श्रृंगी (Chaturshringi), बंडगार्डन (Bundgarden), लष्कर (Lashkar) या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या नावे अभय योजनेसाठी नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अशी माहिती असणारा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. त्यासोबत लाईट बिल, टेलिफोन बिल, आधारकार्ड, मालकी हक्काची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अभियंत्याकडून जागेची पाहणी

अर्ज दाखल झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याकडून जागा पाहणी करण्यात येईल. नियमानुसार अनुज्ञेय असलेले नळजोड नियमित करण्यात येतील. इतर सर्व अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येईल. एक इंच व्यासापेक्षा अधिक व्यासाचे नळजोड नियमित करण्यात येणार नाहीत.

शुल्क भरावा लागणार

नियमित करण्यात येणाऱ्या नळजोडासाठी त्याच्या व्यासाप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्धा इंच, पाऊण इंच आणि एक इंच व्यासाच्या निवासी नळजोड नियमित करण्यासाठी अनुक्रमे चार हजार, साडेसात हजार आणि एकोणीस हजार पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच अर्धा इंच, पाऊण इंच आणि एक इंच व्यासाच्या व्यापारी नळजोड नियमित करण्यासाठी अनुक्रमे 8000, 15000, 35 हजार 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

मोफत मीटर बसविणार

शुल्काची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर पाणीपुरवठा विभागामार्फत प्रत्येक नियमित केलेल्या
नळजोडाला नि:शुल्क पद्धतीने एएमआर (AMR) मीटर बसविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा
अभय योजनेमध्ये चाळ विभाग, अनधिकृत झोपडपट्टी, गावठाण, गुंठेवारीतील घरे यांचाही समावेश
करण्यात आलेला आहे.

 

Web Title : Pune Corporation | Abhay Yojana to regularize unauthorized plumbing of Pune Municipal Corporation; Find out the rates

 

हे देखील वाचा :

LIC Money Back Plan | केवळ 150 रुपयात घ्या LIC ची पॉलिसी ! मिळेल 19 लाखांचा फायदा; पाहिजे तेव्हा पैसे परत; जाणून घ्या कसे?

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 220 नवीन रुग्ण, 237 जणांना डिस्चार्ज

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

BJP MLA | ज्येष्ठ BJP कार्यकर्त्याच्या घरी आमदाराची टर उडवणारी टिपणी; थेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांकडे तक्रार

 

Related Posts