IMPIMP

Pune Crime | पुण्यात अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी; शरीरसुखाची मागणी करणार्‍या फोनवरुन प्रकार उघडकीस

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मेट्रोमनी वेबसाईटवरील ओळखीनंतर त्यांची तीन वर्षे मैत्री होती. मात्र, त्याने दुसर्‍या मुलीबरोबर साखरपुडा केला. याबाबत या डॉक्टर तरुणीने (lady doctor) विचारणा केल्यावर त्याने या तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल (Fake Profile) तयार करुन त्यावर अश्लिल पोस्ट (objectionable posts) टाकल्या. त्यामुळे या तरुणीला अनेकांनी फोन करुन शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षाच्या डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुधांशु प्रदीपकुमार पारीख (वय ३७, रा. आदित्य रेसिडेन्सी, पिंपळे निलख) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भारत मेट्रोमनी या वेबसाईटवर लग्नाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरुन त्यांची आरोपीशी ओळख झाली. २०१६ ते २०१९ दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्यात व्यवस्थित बोलणे चालू होते. फिर्यादीबरोबर बोलणी सुरु असताना आरोपीने दुसर्‍या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली. तेव्हा आरोपी व त्याच्या आईवडिलांनी फिर्यादी यांच्या क्लिनिकवर येऊन फिर्यादींना शिवीगाळ (Pune Crime) केली. तसेच फिर्यादी काम करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करुन फिर्यादीची बदनामी केली. तसेच आरोपीने एका वेबसाईटवर फिर्यादीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली. त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे त्यांना अचानक अनेक अनोळखी लोकांनी फोन करुन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक चाटे तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | 36-year-old doctor defamed for posting obscene posts in Pune; Revealed the type from the phone asking for body comfort

 

हे देखील वाचा :

Modi Government | खुशखबर ! शेतकरी आता विना गॅरंटी घेऊ शकतील 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

Khel Ratna Award | गोल्डन बॉय नीरज चोप्राला ‘खेल रत्न’; शिखर धवनसह 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’

Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

 

Related Posts