IMPIMP

Pune Crime | पुणे महापालिकेच्या ठेकेदार कंपनीच्या 3 अभियंत्यांविरूध्द गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Vehicles vandalized in Narhe area of pune sinhagad road police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे काम पाटील कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर (Patil Construction and Infrastructure) या कंपनीला देण्यात आलेले आहे. कात्रज येथील सुख सागरनगर (Sukhsagar nagar, Katraj) येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामात सुरक्षेच्या बाबत उपाययोजना न केल्यामुळे मोटरसायकल वरील दोघेजण खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले. यामध्ये ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा दिसून आल्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर (Patil Construction and Infrastructure) या कंपनीसह अभियंते सचिन कुरणे (Engineer Sachin Kurne), शैलेश जाधव (Shailesh Jadhav), लापसिंग (Lapsing) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महादेव सूर्यवंशी (वय 25 रा. गोकुळ नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील सुखसागर नगर येथे गट क्रमांक 31 मधील ओढ्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी खोदाई देखील करण्यात आली आहे. या कामाच्या भोवतीने सुरक्षा जाळी लावणे सूचना फलक लावणे बॅरिकॅडींग करणे आदी कोणत्याही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोटरसायकलवरून जात असलेले सूर्यवंशी आणि त्यांचा मित्र खंडू पुजारी हे दोघेही खड्ड्यांमध्ये जाऊन पडले. ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Web Title : Pune Crime | Case filed against 3 engineers of Pune Municipal Corporation contractor company

 

हे देखील वाचा :

Baramati News | बारामतीतील दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुन; पुनावळे येथील घटना

Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

 

Related Posts