IMPIMP

Pune Crime Court News | पुणे : पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातुन आरोपीची निर्दोष मुक्तता

by sachinsitapure
Pune Court

पुणे : – Pune Crime Court News | पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाचा गुन्हा सिद्ध न झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि . डी. निंबाळकर (Judge VD Nimbalkar) यांनी हा आदेश दिला. ॲड. राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यांनी आरोपीच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. हडपसर पोलीस स्टेशनच्या (Hadapsar Police Station) हद्दीत 2020 मध्ये ही घटना घडली होती.

अशोक बाबुराव देवडे (वय 76, रा. म्हाडा कॉलनी हडपसर पुणे ) व मयत इसम रामदास दगडू वाघमारे (वय 45 राहणार समर्थ नगर म्हाडा कॉलनी पुणे) हे दोघे दारू पिऊन सतत भांडण करत होते. मयत रामदास वाघमारे हा अटक आरोपी अशोक देवडे यांना शिवीगाळ केली. तसेच पत्राच्या शेडमध्ये झोपण्यास विरोध करीत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरुन आरोपी अशोक देवडे यांने 4 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 11.20 वाजता सुमारास रामदास वाघमारे हा झोपेत असताना त्याला जीवे व ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या डोक्यात, छातीवर, तोंडावर, मोठा दगड मारून गंभीर जखमी करून जिवे व ठार मारले होते. याप्रकरणी मयताचे भाऊ श्रीराम दगडू वाघमारे यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. औरंगाबादकर यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले होते. सरकारी वकिलांकडून या प्रकरणात अटक आरोपी अशोक बाबुराव देवडे यांनीच मयत रामदास दगडू वाघमारे यांच्यात झोपेच्या जागेवरून भांडण होऊन सदरचा खून झाला, हे कोर्टासमोर सिद्ध करता आले नाही. फिर्यादीचा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असल्याचे अधोरेखित करून, न्यायालयाने कथित तथ्य तपासली. ज्यामध्ये हेतू, आरोपीची घटनास्थळी उपस्थिती, गुन्हा केल्यानंतर त्याचे वर्तन या सर्व गोष्टी पाहिल्या. ॲड. राकेश सोनार यांची युक्तीवाद पहिला असता सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध संशयापलीकडे गुन्हा सिद्ध केलला नाही. ॲड. राकेश सोनार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि . डी. निंबाळकर साहेब यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना, उमंग यादव, कुमार खराडे, प्रज्वल पवार, ऋतिक जाधव व ओंकार विर, शाक्य सुवी, ॲड. विनय साबळे, ॲड. प्रणव जोशी यांनी सहकार्य केले.

Related Posts