IMPIMP

Pune Crime | चाकूच्या धाकाने भर दिवसा दोघा तरुणांचे अपहरण; Google Pay द्वारे दीड लाखाची खंडणी ‘वसुल’

by nagesh
Pune Crime | Kidnapping of two youths with a knife; ransom via Google Pay Rs 1.5 lakh

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मोटारीतून आलेल्या चौघा चोरट्यांनी दोघा तरुणांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडून गुगल पे (Google Pay) द्वारे दीड लाख रुपये खंडणी (Ransom) वसुल केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. हा प्रकार चाकणजवळील (Chakan) भांबोली फाटा, वराळे दरम्यान १८  ऑक्टोबर रोजी घडला (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी मोहम्मद अहमद सगीर (वय २८, रा. वासोली फाटा, एमआयडीसी चौक, खेड, मुळ रा. दुमदुमवा, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात Chakan Police Station (गु. र. नं. १२९२/२१) फिर्याद (Pune Crime) दिली आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगीर व मुक्तार खान हे भांबोली फाटा येथे असताना मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून गाडीत बसविले. त्यांचे अपहरण (Kidnapping) केले. पकडीने हाताचे बोट कापण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील ५० हजार रुपये जबरदस्तीने (Pune Crime) काढून घेतले. तसेच त्यांच्याकडून गुगल पेद्वारे सौरभ वसंत टोपे याच्या नावावर २५ हजार रुपये, २५ हजार रुपये आणि ५० हजार रुपये असे तीन वेळा पैसे पाठविण्यास भाग पाडून खंडणी (Extortion) वसुल केली व त्यांना सोडून पळून गेले.

 

Web Title: Pune Crime | Kidnapping of two youths with a knife; ransom via Google Pay Rs 1.5 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! सॅनफ्रान्सिको ते पुणे विमान प्रवासादरम्यान चोरले ‘सामान’; 45 वर्षीय महिलेकडून एअर फ्रान्स कंपनीमधील कर्मचार्‍याविरुद्ध FIR

Colleges Reopen In Maharashtra | राज्यभरातील महाविद्यालये आजपासून खुली; 50 % पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदी ‘वधारली’, जाणून घ्या आजचे दर

Bank of India Recruitment 2021 | बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

 

Related Posts