IMPIMP

Pune Crime | शिविगाळ केली म्हणून जन्मदात्या पित्याचा खून; पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | शिविगाळ केली म्हणून चक्क मुलाने जन्मदात्या पित्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून (Pune Crime) मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी (28 ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास मावळ तालुक्यातील (Maval taluka) चंदनवाडी-चांदखेड येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, राजू शंकर पारधे (Raju Shankar Pardhe) (वय, 53 रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. मुलगा गणेश राजू पारधे (Ganesh Raju Pardhe) (वय, 28 या मुलाला पोलिसांनी (Pune Crime) ताब्यात घेतलं आहे. मृत राजू पारधे हे आरोपीचे वडील होते. त्यांनी त्यांची पत्नी मंजुळाबाई, मुलगा गणेश आणि घरातील इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून गणेशने वडील राजू यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील दगडी कठड्यावर ढकलून दिले. राजू पारधे दगडी कठड्यावर जोरात आपटले. त्यातच त्यांचा मृत्यू (Died) झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करून पोलिसांनी गणेश याला अटक (Arrested) केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस (Police ) तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Murder of father by son; Incidents in Maval taluka of Pune

 

हे देखील वाचा :

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Pune News | नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (प्रभाग क्रमांक 9) गावातील नागरिकांना सरंजाम वितरण

Pune Crime | १९ वर्षीय तरूण सहकार्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण ! यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts