IMPIMP

Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देत महिलेसोबत गैरवर्तन, लोणीकंद परिसरातील प्रकार

by nagesh
Pune Crime News | Abuse of woman by threatening to kill, type in Lonikand area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | ‘मला तुझी खुप आठवण येते, मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही’ असे म्हणत महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) शनिवारी (दि.4) सकाळी साडेनऊच्या सुमारास हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज उर्फ गोट्या येटाळे (वय-28 रा. वाशी ता. करविर, जि. कोल्हापूर-Kolhapur) याच्यावर आयपीसी 354, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ‘मला तुझी खुप आठवण येते, मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही’ असे म्हणत आरोपीने फिर्य़ादी यांच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तू जर मला भेटली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तसेच घरच्यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भदे (PSI Bhade) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Abuse of woman by threatening to kill, type in Lonikand area

 

हे देखील वाचा :

Sambhaji Raje | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी राजे आक्रमक; म्हणाले…

Pune Pimpri Chinchwad Crime | अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या पतीला बेदम मारहाण; देहुरोड परिसरातील घटना

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

 

Related Posts