IMPIMP

Pune Crime News | खिशात पैसे न मिळाल्याने तरुणाच्या पोटात चाकू खुपसुन केले जखमी; येरवड्यातील गुंजन चौकातील घटना

by nagesh
Pune Crime News | Attempt To Murder Kill Incident At Yerwada Gunjan Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | मित्रांसह घरी जात असताना काही मुले गोंधळ घालत असल्याचे पाहून थांबल्यावर त्यातील
दोघांनी तरुणाचे जबरदस्तीने खिसे तपासले. मात्र, त्याच्या खिशात काहीही न सापडल्याने त्याच्या पोटात चाकू खुपसुन (Attempt To Murder) त्याला
गंभीर जखमी केले. (Pune Crime News )

 

याप्रकरणी कृष्णा रघुनाथ इंगळे Krishna Raghunath Ingle (वय २४, रा. बोधनगर, लिंक रोड, पिंपरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिखली (Chikhali, Pune) येथे साफसफाईचे काम करतात. ते आपल्या मालकाबरोबर पेरणे फाटा येथे विजयस्तंभाला अभिवादनासाठी गेले होते. तेथे गर्दीत त्यांची चुकामुक झाली. तेव्हा त्यांच्या घराजवळ राहणारे दोघे जण भेटले. त्यांच्याबरोबर मोटारसायकलवरुन ते रात्री साडेदहा वाजता घरी परत जात होते. त्यावेळी गुंजन टॉकीज चौकात ४ ते ५ जण गोंधळ घालत होते. त्यांनी गाडी बाजूला घेऊन त्याचे ओळखीचे त्या मुलांकडे गेले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गोंधळ घालणार्‍या मुलांपैकी दोघांनी फिर्यादी यांचे खिसे तपासले. त्यात काही मिळाले नाही.
तेव्हा शिवीगाळ करुन एकाने त्यांच्या पोटात चाकू खुपसला.
त्यांना प्रतिकार करत फिर्यादी स्वत:चा जीव वाचविण्याकरीता अंधारात पळत जाऊन तबेल्यात लपले.
चाकू खुपसला तेथून खूप रक्तस्त्राव होत होता. काही वेळ थांबून ते तेथून बाहेर आले.
तेव्हा रस्त्यावर गोंधळ घालणारे दिसून आले नाही. तेव्हा ते रस्ता ओलांडून पलिकडे गेले.
परंतु, त्यांना ग्लानी आल्याने ते तेथेच पडले. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर ते कसे बसे चालत गेले.
तेव्हा त्यांना समोरच पोलीस स्टेशन दिसले. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले.
ससूनमध्ये डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Attempt To Murder Kill Incident At Yerwada Gunjan Chowk

 

हे देखील वाचा :

Mahavitaran Strike | पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणची बत्ती गुल; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडीत

Pune Crime News | कोयत्याने दहशत निर्माण करणार्‍या नाना पेठ आणि रविवार पेठेतील 5 जणांना अटक; समर्थ पोलिसांची कामगिरी

Pune Crime News | कात्रज परिसरात लोखंडी प्लेटा चोरणार्‍यांचा पर्दाफाश; भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांना अटक

 

Related Posts