IMPIMP

Pune Crime News | पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणे पडले महागात, रवींद्र धंगेकरांसह 35-40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure

पुणे : – Pune Crime News | पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) एक दिवस आगोदर रविवारी (दि.12) महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपकडून (BJP) पैसे वाटप होत असल्याचा आरोप करुन सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर (Sahakar Nagar Police Station) आंदोलन केले. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तक्रार करुन देखील पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे सांगत धंगेकर यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, ठिय्या आंदोलन करणे रवींद्र धंगेकर यांना महागात पडले आहे. पोलिसांनी धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कर्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अभिजीत तुकाराम बालगुडे (वय-32) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नितीन मधुकर कदम, रवींद्र धंगेकर, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडीत, अनिल सातपुते व इतर 35 ते 40 जणांवर आयपीसी 143, 145, 149, 188 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, लोकप्रतिनीधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या 35-40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकर यांनी घेतला होता.

रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आदेशाचे आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहीतेच भंग केला. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून व घोषणा देऊन आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे करीत आहेत.

Jio OTT Broadband Data Plan | जीओकडून 888 रुपयांचा नवीन ‘ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅन’ सादर

Related Posts