IMPIMP

Pune Crime News | पुणे : सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’मध्ये चोरी, दोघांना अटक

by sachinsitapure

पुणे : – Pune Crime News | पूर्वी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने साथीदाराच्या मदतीने दुकानातून साडे तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना 4 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आणि बुधवारी रात्री सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth Pune) ‘रमेश डाईंग’ (Ramesh Dyeing Pune) मध्ये घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

सलमान मुजावर (रा. दापोडी), निखिल राजारम पास्टे (वय-21 रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत प्रथमेश मिलिंद शहा (वय 28, रा. जयंती बंगला, मोतीबाग सोसायटी, प्रेम नगर, मार्केट यार्ड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सदाशिव पेठेत रमेश डाईंग नावाने बॅग, ट्रॉली बॅग, उन्हाळी कपडे, छत्री, पावसाळी रेन कोट विक्रीचे दुकान आहे. तसेच त्यांचे सदाशिव पेठेत गोदाम आहे. आरोपींनी बनावट चावीने गोदाम उघडून विविध कंपन्या, विविध मॉडेलच्या 30 ट्रॉली बॅग, 26 डफल बॅग, 12 सॅक, 36 छत्र्या असा एकूण 3 लाख 28 हजार 478 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांना सांगितले की, सीसीटीव्ही मध्ये दोन जण गोदामातून बाहेर पडताना दिसल्याचे सांगितले. आरोपींना काही महिन्यापूर्वी कामावरुन काढून टाकले होते. पोलिसांना आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

Pune Lok Sabha : विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

Related Posts