IMPIMP

Pune Crime | ‘मीच या वस्तीचा दादा’ ! पुण्यातील सहकारनगरमध्ये भरवस्तीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील सहकार नगर परिसरात (Sahakarnagar Area) हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत पसरवल्याची घटना घडली होती. या घटेनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरु केली होती. या घटनेला काही दिवस होत नाही तोच याच परिसरात आणखी एक प्रकार समोर (Pune Crime) आला आला. 19 आणि 16 वर्षाच्या तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन ‘या वस्तीचा दादा मीच’ म्हणत दहशत पसरवत वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) केली. पोलिसांनी कृष्णा सुभाष वैराळ (Krishna Subhash Vairal) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारावर सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) IPC 307, 504, 427, 34 आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत सचिन सुरेश भोसले Sachin Suresh Bhosale (वय – 36 रा. शंकर महाराज वसाहत, ठाकुर गिरणी शेजारी, धनकवडी -Dhankawadi) यांनी बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा वैराळ (वय – 19 रा. दिग्वीजय कॉलनी, संतोष नगर, कात्रज – Katraj) आणि 16 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर घडला. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यापूर्वी एकमेकांच्या घराशेजारी राहत होते.
बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांना ‘मला घाबरुन राहयचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो’ असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादी यांच्यावर वार केला.
मात्र, फिर्यादी यांनी हा वार चकवून घरात पळून गेले.
त्यानंतर आरोपींनी या परिसरातील पाच दुचाकी आणि एक चारचाकी गाडीची तोडफोड करुन 21 हजार 500 रुपयांचे नुकसान केले.

 

तसेच फिर्यादी यांच्या गाडीची पेट्रोल टाकी फोडली.
त्यानंतर आरोपींनी हातातील धारदार हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन ‘मीच इथला दादा आहे’ असे बोलून दहशत निर्माण केली.
आरोपी निघून गेल्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकत्रीत येऊन पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Crime Marathi News Of Sahakar Nagar Area

 

हे देखील वाचा :

FD Interest Rates | ‘या’ बँकेने केली FD वरील व्याजदरात वाढ

Devendra Fadnavis On Raj Thackeray | राज ठाकरेंचे आधीचे बोल गुलुगुलु वाटायचे अन् आता खाजवायला होतंय- देवेंद्र फडणवीस

Pune Water Problem | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

 

Related Posts