IMPIMP

Pune Crime | पिंपरीत 60 लाखांची विदेशी दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

by nagesh
Pune Crime | pune excise department seized 60 lakh rs liquor in pimpri chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मुंबई – बंगळुरू महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) तळेगाव टोल नाका परिसरात विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ही दारू गोव्यात विक्रीसाठी नेली जात होती. पकडण्यात आलेल्या दोन कंटेनरमधून (Container) तब्बल 60 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) केली आहे. याप्रकरणी वाहन चालक जयकिसन धीमाराम ढाका (Jaikisan Dhimaram Dhaka), सुजानाराम जियाराम बिष्णोई (Sujanaram Jiyaram Bishnoi) (दोघे रा. राजस्थान) यांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

गोवा राज्यात बेकायदा दारू विक्री करण्यासाठी दोन कंटेनर जाणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला (Excise Department) मिळाली होती. या माहितीनुसार, ट्रक (M.H 48. A.Y – 9434) आणि कंटेनर (M.H. 04, J.U – 3515) यांना सोमाटने टोलनाका परिसरात (Somatne Toll Naka Area) पकडले. त्यानंतर दोन्ही गाड्यांची झडती घेतली. त्यामध्ये मॅकडॉल नं. 1 व्हिस्की, टुबोर्ग स्ट्राँग बिअर, आईस मॅजिक व्होडका, अ‍ॅड्रीयल व्होडका, रॉयल ब्लू व्हिस्की या विदेशी मद्याचे एकूण 1 हजार 6 बॉक्स सापडले. हा मुद्देमाल एकूण 59 लाख 60 हजार 400 रुपये असल्याची माहिती आहे. (Pune Crime)

 

यानंतर उत्पादन शुल्क विभागाने दोन्ही कंटेनरही ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 87 लाख 75 हजार 400 रुपये इतकी असल्याची माहिती आहे. हा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. वाहन चालकांवर गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे (Deputy Inspector B. S. Ghuge), दिपक सुपे (Deepak Supe) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pune excise department seized 60 lakh rs liquor in pimpri chinchwad

 

हे देखील वाचा :

Banana Benefits | 4 पद्धतीने यावेळी करा केळीचे सेवन, दूर पळतील ‘हे’ आजार, होतील आश्चर्यकारक 7 फायदे

Indian Railways | प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती ! IRCTC App वरून दरमहा 12 रेल्वेची तिकीटे काढता येणार

Banana Flower For Diabetes | डायबिटीजचा जबरदस्त उपाय आहे केळफूल, वेगाने कमी करते Blood Sugar

 

Related Posts