IMPIMP

Pune Crime | हिंजवडी आणि भोसरीत महिलांच्या विनयभंगाच्या दोन घटना

by nagesh
Pune Crime | Two incidents of molestation of women in Hinjewadi and Bhosari

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) दोन महिलांचा विनयभंग (Molestation Case) केल्याच्या घटना घडल्या आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Bhosari MIDC Police Station) हद्दीत एका कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तर हिंजवडीमध्ये (Hinjawadi) एका सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) राजु कतरी (Raju Katari) तर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात किरण बोरसे (Kiran Borse) याच्यावर आयपीसी 354,509 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हिंजवडी पोलीस ठाण्यात एका 40 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.24) सकाळी दहाच्या सुमारास भुमकर चौक (Bhumkar Chowk) परिसरातील एका सोसायटीमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपीकडे घरकाम करण्याचे काम करते. रविवारी सकाळी दहाच्या सुमार महिला घरात काम करत असताना आरोपीने तिच्याकडे शरीर संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. त्यानंतर तिचा हात आणि पदर ओढून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) करत आहेत. (Pune Crime)

 

 

दुसऱ्या घटने एका 32 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण बोरसे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भोसरी एमआयडीसी येथील टी ब्लॉकमधील (T Block) एका कंपनीत काम करते. कंपनीत काम करत असताना आरोपीने फिर्यादीसोबत अश्लील चाळे करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.ए. कदम (PSI P.A. Kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Two incidents of molestation of women in Hinjewadi and Bhosari

 

हे देखील वाचा :

How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?

Mutual Fund SIP | रु. 100 मंथलीपासून सुरू करू शकता गुंतवणूक, ‘या’ स्कीम्समध्ये 5 वर्षात डबल-ट्रिपल ‘वेल्थ’; काय म्हणतात एक्सपर्ट

NCP Chief Sharad Pawar | ‘मी अनेकदा सत्ता गमावली, मात्र…’, शरद पवारांनी सांगितला ‘पुलोद’ सरकारचा किस्सा

 

Related Posts