IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘मी अनेकदा सत्ता गमावली, मात्र…’, शरद पवारांनी सांगितला ‘पुलोद’ सरकारचा किस्सा

by nagesh
Koregaon-Bhima Violence Case | NCP Chief sharad pawar will appear as a witness again in mumbai regarding the violence at koregaon bhima of pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुण्यात (Pune) बोलताना अनेक
विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 1980 मध्ये पुलोद सरकार (Pulod Government) बरखास्त (Dismissed) झाल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून (BJP) राज्यातील कायदा, सुव्यवस्था (Law and Order) बिघडली असल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. यावर बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सरकार गेल्याने काही जण अस्वस्थ
आहेत. सत्ता गेल्याने वाईट वाटणं स्वाभाविक आहे. परंतु सत्ता येत जात असते. सत्ता गेल्याने इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी
भाजपला टोला लगावला. (NCP chief Sharad Pawar slams BJP Leader)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मी अस्वस्थ झालो नाही

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. परंतु त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही, असे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी 1980 मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण सांगितली. 1980 मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. 1980 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले. मात्र मी अस्वस्थ झालो नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.

 

 

वानखेडेवर मॅच पहायला गेलो

पुलोद सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून (Chief Secretary) समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलावून घतले. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि दुसरीकडे राहण्यास गेलो. त्यावेळी वानखेडेवर (Wankhede) भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) कसोटी सामना सुरु होता. मुख्यमंत्री निवास (CM Residence) सोडल्यानंतर मी वानखेडेवर मॅच (Test Match) पाहण्यासाठी गेलो होतो, असे पवारांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आपल्या धार्मिक भावना स्वत: पर्यंत ठेवाव्यात

सध्या राज्यात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाद सुरु आहे. या वादावर बोलताना शरद पवार म्हणाले,
प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको.
मशिदीवरील भोंग्याच्या (Azaan Loudspeakers) प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government)
सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सर्वांनी निर्णय घेऊन समोपचारानं प्रश्न निकाली काढला तर उत्तम होईल, असेही पवार म्हणाले.

 

 

Web Title : NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar tells what happened when his
pulod government dismissed by then pm indira gandhi

 

हे देखील वाचा :

Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Municipal Elections | महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर?; सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली, आता ‘या’ तारखेला ‘सुप्रीम’ सुनावणी

PM Kisan Yojana Update | 11 वा हप्ता येण्यापूर्वी पीएम किसान योजनेत झाले ‘हे’ मोठे बदल, लवकर करा अपडेट अन्यथा…

 

Related Posts