IMPIMP

Pune Crime | विना परवाना पिस्टल बाळगणारा गुन्हे शाखेकडून गजाआड, अग्नीशस्त्र जप्त

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विना परवाना पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या तरुणाला पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकच्या (anti extortion cell pune) पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.4) येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) हद्दीतील महावीर सोसायटी जवळील गाडीतळ येथे करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीची एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त करण्यात आली आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

शुभम उर्फ डांग्या जगन्नाथ शेळके Shubham alias Dangya Jagannath Shelke (वय- 21 रा-सर्वे नंबर-02 महाविर सोसायटी जवळ, गाडीतळ, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

खंडणी विरोधी पथक एक मधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अतुल साठे (Atul Sathe) यांना महावीर सोसायटी जवळ असलेल्या गाडीतळ येथे एक तरुण देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ (Police Inspector Vinayak Vetal),
सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
पोलीस हवालदार अतुल साठे, संजय भापकर, पोलीस नाईक रमेश चौधर, गजानन सोनवलकर, नितीन कांबळे, पोलीस शिपाई अमर पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Unlicensed pistol-wielding pune police crime branch seizes firearms

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् विश्रांतवाडी केली बेदम मारहाण; परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात डिलीव्हरी बॉयनं पार्सल घेणार्‍या 23 वर्षीय तरूणीला पाहून थेट केलं ‘हस्तमैथुन’, कोंढवा-उंड्रीतील घटना

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा वारजे पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; दारू पिऊन केला ‘राडा’, प्रचंड खळबळ

 

Related Posts