IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा वारजे पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; दारू पिऊन केला ‘राडा’, प्रचंड खळबळ

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | सराईत गुन्हेगाराने दारुच्या नशेत पोलीस चौकीत येऊन खिडकीच्या काचा हाताने फोडल्या असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. वारजे पोलीस चौकीत (Warje Police Chowki) झालेल्या या खळबळजनक प्रकाराबद्दल पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न (Attempt to Suicide) केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मंगेश विजय जडीतकर (वय २१, रा. पारुदत्त कॉम्प्लेक्स, दांगट पाटील नगर, वारजे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर मंगेशकर
हॉस्पिटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital Pune ) उपचार करण्यात येत आहे.

मंगेश जडीतकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वारजे माळवाडीत (Warje Malwadi) एका टेम्पोचालकाला कोयत्याचा धाक दाखवून
लुटल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) मंगेश जडीतकर व त्याचा साथीदार गौरव पासलकर या दोघांना मार्चमध्ये अटक केली होती. त्यानंतर तो सध्या जामीनावर सुटला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जनार्धन होळकर (PSI Janardhan Holkar) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेश जडीतकर हा शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत वारजे पोलीस चौकात आला होता. त्याने तेथे येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करुन “माझी तक्रार घ्या मला ओळखत नाही का मी गुन्हेगार आहे. मला मंगेश् जडीतकर म्हणतात, मी आता जीव देतो,” असे म्हणू लागला. तेव्हा होळकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या. त्यात तो जखमी झाला. चौकीसमोर मार्शल ड्युटी करणारे पोलीस शिपाई काटे यांच्या मोटारसायकलच्या स्पीडो मीटरच्या काचेवर धडक (Pune Crime) दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी तातडीने मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे (police inspector amrut marathe) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Criminal Attempt to suicide at Warje police chowki station in Pune; doing wrong thing after drinking alcohol, huge excitement

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

 

Related Posts