IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | young man attempts suicide climbing electric dp hinjawadi incident pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील हिंजवडी (Hinjawadi) माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर चढून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केला असल्याची माहिती समोर (Pune Crime) आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांमुळे आत्महत्या करणा-या युवकाचा जीव वाचला आहे. त्या युवकाला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (सोमवारी) दुपारी 12.30 च्या सुमारास माण रस्त्यावरील वडजाई नगर येथे घडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर एक अज्ञात युवक दुपारच्या दरम्यान अचानक विद्युत डीपीवर (Electrical DP) चढल्याने स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. त्या दरम्यान तेथील नागरीकांनी MSEB च्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळवली. यानंतर तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती समजताच जवान देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी युवकाला खाली येण्याची विनंती केल्यानंतर तो खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, आपल्या हिमतीने टप्पा क्रमांक एक मधील अग्निशमन दलाच्या जवानांनी संबधित युवकाला लोखंडी शिडीच्या सहाय्याने खाली उतरवले आहे. (Pune Crime)

 

उष्ण विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने अज्ञात युवक काही प्रमाणात भाजला आहे. त्यामुळे त्या युवकाला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान, विद्युत विभागाचे अधिकारीबरोबरच अग्निशमन विमोचक चंद्रशेखर मतकर (Chandrasekhar Matkar), कर्मचारी दत्ता खेडेकर (Datta Khedekar), प्रविण पिंगळे (Pravin Pingale), निखिलेश शिवगन (Nikhilesh Sivagan) हे घटनास्थळी उपस्थित होते.

 

Web Title: Pune Crime | young man attempts suicide climbing electric dp hinjawadi incident pune

 

हे देखील वाचा :

Risk Free Money | जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला होईल फायदा ! जाणून घ्या कसा बनवला जातो ‘रिस्क फ्री मनी’

Maharashtra Budget Session | ठाकरे सरकारचा निर्णय ! यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात होणार

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्येही ‘हा’ 100 रुपयांचा स्टॉक, एक्सपर्ट देत आहेत खरेदी करण्याचा सल्ला

 

Related Posts