IMPIMP

Risk Free Money | जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला होईल फायदा ! जाणून घ्या कसा बनवला जातो ‘रिस्क फ्री मनी’

by nagesh
Risk Free Money | if you invest your savings money in these places you be in profit learn how risk free money is made 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Risk Free Money । नोकरी करणारे लोक आणि लहान व्यवसाय असलेले लोक सहसा सुरक्षित गुंतवणुकीसाठी (Risk Free Money) पर्याय शोधत असतात. ज्यामध्ये अनेक वेळा हे लोक योग्य ठिकाणी पैसे गुंतवतात तर कधी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यामुळे या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेक वेळा लोकांना गुंतवणूक करण्याचा योग्य मार्ग माहित नसतो. यामुळे गरजेच्या वेळी तुमच्याकडून गुंतवणूक झालेली रक्कम तुम्हाला वेळेवर मिळणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे असे काही मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवू शकाल. चला त्याबद्दल जाणून घेऊया..

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

फाइनेंशियल सिक्योरिटी (financial security) – सर्वप्रथम तुम्ही तुमची फाइनेंशियल सिक्योरिटी सुनिश्चित केली पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही एका महिन्यात खर्च केलेल्या रकमेच्या किमान 6 पट रक्कम सुरक्षित (Risk Free Money) ठिकाणी गुंतवावी. कारण काहीवेळा नोकरी गमावल्यास किंवा व्यवसायात नुकसान झाल्यास तुम्ही गुंतवलेली ही रक्कम तुम्हाला उत्पन्नाचा दुसरा स्रोत निर्माण करण्यास उपयोगी पडते. अशा परिस्थितीत फाइनेंशियल सिक्योरिटीसाठी तुम्ही बँक (bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (post office) एफडी (FD)करू शकता.

 

फाइनेंशियल स्टेबिलिटी (financial stability) – फाइनेंशियल स्टेबिलिटी द्वारे, भविष्यातील खर्चासाठी आणि कठीण काळासाठी तुम्ही मोठी रक्कम जमा करावी. यामध्ये वर्षभरासाठी तुमच्या पगाराच्या किमान 5 ते 6 पट रक्कम ठेवावी. हे पैसे तुम्ही कधीही प्रॉपर्टीमध्ये गुंतवू नका. त्यापेक्षा हा पैसा आरडी किंवा PPF मध्ये ठेवावा. कारण या ठिकाणी तुम्हाला लगेच पैसे मिळतील. तसेच, जेव्हा तुमची मालमत्ता विकली जाईल, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

नॉर्मल इन्वेस्टमेंट (normal investment) – बरेचदा लोक अधिक रिटर्न मिळविण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण इथे तुमची गुंतवणूक सुरक्षित नाही. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळावे. अशा परिस्थितीत तुम्ही प्लॉट, सोने किंवा सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. आत्तापर्यंतच्या बाजारातील ट्रेंडनुसार प्लॉट आणि सोन्याच्या किमतीत वाढ कायम आहे. अशावेळी तुमची येथील गुंतवणूक सुरक्षित राहील.

 

 

रियल इन्वेस्टमेंट (real investment) – तुम्हाला या गुंतवणुकीत पैसे गुंतवण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमचे स्किल, नॉलेज आणि एटीट्यूट विकसित करायला हवे. ज्याद्वारे तुमच्या उत्पन्नासोबतच तुमचा दृष्टीकोनहि स्पष्ट होईल. त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय सहज निवडू शकाल.

Web Title : Risk Free Money | if you invest your savings money in these places you be in profit
learn how risk free money is made 

 

हे देखील वाचा :

Maharashtra Budget Session | ठाकरे सरकारचा निर्णय ! यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात होणार

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्येही ‘हा’ 100 रुपयांचा स्टॉक, एक्सपर्ट देत आहेत खरेदी करण्याचा सल्ला

 

 

Related Posts