IMPIMP

Pune Customs Seizes Ganja | पुणे सीमा शुल्क विभागाची सोलापूरमध्ये मोठी कारवाई, 2 कोटी 20 लांखांचा गांजा जप्त (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Pune Customs Seizes Ganja | गांजा विक्रीला बंदी असली तरी परराज्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. पुणे सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. पथकाने तब्बल दोन कोटी 20 लाख रुपये किमतीचा 833 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोलापुर ग्रामीण भागातून जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक केली आहे. ट्रक चालक सुधीर चव्हाण (वय- 32 रा. नरसिंहपूर, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडीसा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकला मिळाली होती. यानंतर एक पथक सोलापूर ग्रामीण भागात पाठवण्यात आले होते. एका आयशर ट्रकमधून गांजा आल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने गाजाचा ट्रक शोधून ताब्यात घेतला. ट्रकची पाहणी केली असता कोणाला संशय किंवा वास येऊ नेय यासाठी कोंबड्यांची विष्ठा असलेल्या पोत्याखाली गांजा लपवल्याचे आढळून आले.

पथकाने 2 कोटी 20 लाखांचा 883 किलो गांजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता आरोपी स्वत: गांजाचा मालक असून तो ओडीसा मधून ट्रक घेऊन आल्याचे सांगितले.या गांजाची विक्री सोलापूर भागात करण्यात येणार होती. गांज्या सोलापूर पर्यंत येईपर्यंत कोण कोणत्या भागात गांजा विकला याचा तपास सीमा शुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत. आरोपीवर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Related Posts